गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी नाशिकमध्ये ‘ॲक्शन प्लॅन’…. पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत आंतरविभागीय बैठक संपन्न….
नाशिक शहरासह परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर पूर्णपणे लगाम घालण्यासाठी नाशिक पोलीस प्रशासन कमालीचे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आज पोलीस आयुक्त कार्यालयात एका महत्त्वाच्या आंतरविभागीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहराचे माननीय पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
महाराष्ट्र राज्याच्या उपसचिवांकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही पावले उचलण्यात आली आहेत. गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल आणि अनधिकृत कत्तलखान्यांना तातडीने प्रतिबंध घालणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
संयुक्त कारवाई आणि ‘नोडल अधिकाऱ्यांची’ नियुक्ती
बैठकीदरम्यान अवैध कृत्य करणाऱ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला. यासाठी खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या संशयास्पद वाहनांवर आणि अनधिकृत कत्तलखान्यांवर पोलिसांची विशेष नजर असेल.
नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रत्येक संबंधित विभागाला आपापल्या स्तरावर प्रभावी कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ‘नोडल अधिकारी’ नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संयुक्त मोहीम
आगामी काळात सर्व संबंधित विभागांच्या वतीने संयुक्तपणे मोठी मोहीम राबवून बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.या महत्त्वपूर्ण समन्वय बैठकीला प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये.
जिल्हाधिकारी, नाशिक आयुक्त, महानगरपालिका, नाशिक,मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड (देवळाली कॅम्प),मुख्याधिकारी, भगूर नगरपालिका,उपआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, नाशिक व त्यांचे प्रतिनिधी संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे)डॉ. समाधान हिरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा नोडल अधिकारी) भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध अत्यंत प्रभावी आणि समन्वित स्वरूपाची धडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाच्या वतीने या बैठकीत देण्यात आला आहे.






