ताज्या बातम्या नाशिक

अधिकमासानिमित्त रामिभवन येथे दोन दिवसीय विष्णु याग व भजन संध्येचे आयोजन…

अधिकमासानिमित्त रामिभवन येथे दोन दिवसीय विष्णु याग व भजन संध्येचे आयोजन…

‎नाशिक : अधिकमासाच्या पावन पर्वानिमित्त नाशिक सिंधी सोशल ग्रुपच्या वतीने १४ व १५ जून २०२६ रोजी द्वारका येथील झूलेलाल मंदिर, रामीबाई हॉल येथे दोन दिवसीय विष्णु याग व भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे.
‎१४ जून रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रायश्चित्त विधी, श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका-वसोर्धारा पूजन, आयुष्य मंत्र, ऋत्विक वरणम, कुंड पूजन, ग्रह स्थापना तसेच सर्वतोभद्र मंडल देवता पूजन, स्थापना व विष्णु याग आरती यांसह विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. त्यानंतर मंत्रपुष्पांजली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
‎सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध भजनसम्राट श्री अमोल पालेकर व सहकारी (झी सिनेमा फेम) यांच्या उपस्थितीत भव्य भजन संध्या रंगणार असून कार्यक्रमानंतर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
‎१५ जून रोजी विष्णु यागाची सांगता, आरती, मंत्रपुष्पांजली, ब्रह्मभोज व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


‎हा धार्मिक सोहळा झूलेलाल मंदिर, रामीबाई हॉल, हॉटेल चस्का मस्का समोर, तपोवन लिंक रोड, काठे गल्ली, द्वारका, नाशिक येथे होणार असून सर्व भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून भगवान पुरुषोत्तमांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजक पं. सुनील शर्मा व नाशिक सिंधी सोशल ग्रुप यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *