ताज्या बातम्या नाशिक

तरुणाईचा उत्साह, परंपरेची झलक!….NR सिंधी युवा मंडळाचा ‘तीज के रंग’ संपन्न…रॅम्प वॉक, तीजरी क्वीन, फन गेम्स, म्युझिक-डान्स आणि आकर्षक बक्षिसांची मेजवानी……

तरुणाईचा उत्साह, परंपरेची झलक!….NR सिंधी युवा मंडळाचा ‘तीज के रंग’ संपन्न…रॅम्प वॉक, तीजरी क्वीन, फन गेम्स, म्युझिक-डान्स आणि आकर्षक बक्षिसांची मेजवानी……

नाशिकरोड कलानगर येथील पूज्य झुलेलाल मंदिरात तिज के रंग हा कार्यक्रम सखींच्या मोठ्या उत्साहात ३१ ऑगस्टला सायंकाळी संपन्न झाला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी विवाहित महिला आणि कुमारिका चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात.महाराज प्रदीप शर्मा, महाराज मुकेश शर्मा यांच्या उपस्थितीत तीजरी पूजन करण्यात आली.

 


NR सिंधी युवा मंडळाच्या वतीने पारंपरिक तीज सणाचे औचित्य साधून ‘तीज के रंग’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.


तरुणाईला पारंपरिक संस्कृतीशी जोडण्याबरोबरच मनोरंजनाची पर्वणी देणाऱ्या या कार्यक्रमात रॅम्प वॉक, सिंधी तीजरी क्वीन स्पर्धा (१६ शृंगारांसह), फन गेम्स, म्युझिक व डान्स, फोटोग्राफी आणि रील शूट यांसह विविध आकर्षक उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

Video 2
https://www.instagram.com/reel/Dctr7JATp-7/?igsi=Z3o4OGZ0ZHh6OXVw

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मेहंदीला कुंदनचा मोफत स्पर्श देण्यात येऊन उत्कृष्ट मेहंदी डिझाईनसाठी विशेष बक्षीसही जाहीर करण्यात आले. तसेच सहभागींसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात आले. NR सिंधी युवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडविणाऱ्या या सांस्कृतिक सोहळ्याचा मोठ्या संख्येने महिलांनी लाभ घेतला.
सिंधी सखी मंच तसेच NR ग्रूप च्या खनक भोजवानी, कनिषा ओछानी, धूलिका लखवानी, निकिता रामवानी, महक लालचंदानी, सेरिना वासवानी, ज्योती साधवानी, सोनिया नरसिंघानी आदींनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.

Video 1
https://www.instagram.com/reel/DctaBc8zGmr/?igsi=MWl5Z3lpM21mNThjcQ==

Video 2
https://www.instagram.com/reel/Dctr7JATp-7/?igsi=Z3o4OGZ0ZHh6OXVw

Video 3
https://www.instagram.com/reel/Dctu-tKThsM/?igsi=OGFhMmcxY2ZvaHF1

 

Video 3
https://www.instagram.com/reel/Dctu-tKThsM/?igsi=OGFhMmcxY2ZvaHF1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *