ताज्या बातम्या दुःखत वार्ता

हरीश टिल्लूमल मंघनानी यांचे निधन…..व्यापारी वर्गात हळहळ…..

हरीश टिल्लूमल मंघनानी यांचे निधन…..व्यापारी वर्गात हळहळ…..

नाशिकरोड गोसावी वाडी येथील प्रसिद्ध विजय स्वीट्सचे संचालक हरीश टिल्लूमल मंघनानी (५८) यांचे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवंगत हरीश मंघनाणी यांचा अंत्यसंस्कार द्वारका येथील अमरधाम येथे मंगळवारी दुपारी झाला. पगडी रसम गुरुवार 20 ऑगस्ट रोजी HAB सिंधी स्कूल पंडित कॉलनी नाशिक याठिकाणी सायंकाळी 5 ते 5.30 वाजेपर्यंत होणार आहे.
हरीश मंघनानी हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य होते. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व दोन भाऊ असा परिवार आहे. देवानंद मंघनानी व विजय मंघनानी यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *