ताज्या बातम्या नाशिक

भाजपा युवा मोर्चा नाशिक रोड मंडलची कार्यकारिणी जाहीर…. शंतनू निसाळ अध्यक्ष….

भाजपा युवा मोर्चा नाशिक रोड मंडलची कार्यकारिणी जाहीर…. शंतनू निसाळ अध्यक्ष…

 

नाशिक भाजपा नाशिक महानगर जिल्हा युवा मोर्चाच्या नाशिक रोड मंडलची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. युवा मोर्चा अध्यक्ष शंतनू निसाळ यांनी ही कार्यकारिणी घोषित केली असून, भाजपा नाशिक रोड मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.

प्रदेश भाजपाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही कार्यकारिणी गठीत करण्यात आली असल्याचे शंतनू निसाळ यांनी सांगितले.

नूतन कार्यकारिणीत दिपक जाधव, विशाल सातभाई, कपिल खर्जुल व ऋषिकेश नारद यांची सरचिटणीसपदी, तर कांतीलाल बोराडे, नयन निकम, गौरव घुगे, प्रशांत खोले, निपुल भालेराव, ऋषिकेश घोड व केतन बोराडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चिटणीसपदी यश अमेसर, समाधान सांगळे, अभिषेक टर्ले, सौरभ दोषी, सचिन महाजन व सुशील साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. अजिंक्य हिंगमिरे यांच्याकडे कोषाध्यक्षपद, ऋषिकेश वरह यांच्याकडे प्रसिद्धी प्रमुख, यश वराडे यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुख, ओम शिरसाट यांच्याकडे विद्यार्थी संयोजक, पियुष नाठे यांच्याकडे क्रीडा संयोजक, रोहित आढाव यांच्याकडे आत्मनिर्भर भारत संयोजक, तर शुभम पडवळ यांच्याकडे उद्योग विभाग संयोजकपद सोपविण्यात आले आहे.

याशिवाय प्रितम संघवी, पुनीत कांकरिया, हर्षल आहेर, अभिजीत कुलकर्णी, आशिष साळवे, दिनेश दासवानी, विशाल पगार, राजेंद्र बोराडे व कृष्णा महादू बोराडे यांची कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणीत वैभव बच्छाव, सौरभ देसाई, दर्शन पाटोळे, अवधूत पगारे, अमित पाटील, आदित्य नवले, आदित्य नागरे, लहू मुठाळ, अजिंक्य इंगळे, नितीन पाटील, समाधान खरात, सोहम वाघमारे, शुभम महाजन व सम्राट डबे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे भाजपा प्रदेश चिटणीस रोहीणी नायडू-वानखेडे, भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, युवा मोर्चा महानगराध्यक्ष प्रवीण भाटे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे व सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून नाशिक रोड मंडलातील युवा संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *