कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण; सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम….
नाशिक : कन्यारत्नाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्व. अजितदादा पवार सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
संस्थेच्या माध्यमातून हरीश विष्णू पगार व सचिन विलास गायधनी यांच्या कुटुंबात कन्यारत्नाचे आगमन झाल्याच्या आनंदात त्यांच्या अंगणात वृक्षारोपण करण्यात आले. ‘कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण’ या उपक्रमातून मुलीच्या जन्माचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांचा सुंदर संगम साधण्यात आला.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्रीधर गायधनी, बन्सीलाल गायधनी, बबनराव पगार, नामदेवराव गायधनी, अशोकराव गायधनी, विलास गायधनी, सोमनाथ पगार, अध्यक्ष नंदू नरवडे, कार्याध्यक्ष हिरामण गायधनी, सरचिटणीस बाळासाहेब गायधनी, उपाध्यक्ष प्रदीप गायधनी तसेच आशा सेविका वैशाली थेटे आदी उपस्थित होते.
कन्यारत्नाच्या जन्माचे स्वागत वृक्षारोपणाने करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. मुलगी जन्माला येणे हा आनंदाचा क्षण असून तिच्या स्वागतासोबतच भविष्यातील पर्यावरणासाठी एक झाड लावण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.





