क्राईम ताज्या बातम्या

नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; वर्षभरापासून फरार असलेला सराईत चोरटा जेरबंद…..

नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; वर्षभरापासून फरार असलेला सराईत चोरटा जेरबंद…..

नाशिक | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ अर्जुन पवार (वय २१, रा. सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

अशी झाली कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील पाहिजे असलेल्या आणि फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक गस्तीवर असताना पोलीस अंमलदार चंद्रकांत गवळी आणि मनोहर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुक्ताईनगर येथील चोरीच्या गुन्ह्यातील संशयित सौरभ पवार हा खुटवडनगर भागातील ‘तीर्थ एंटरप्रायजेस’ जवळ वावरत आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने मुक्ताईनगर येथील गुन्ह्याची कबुली दिली.

वर्षभरापासून देत होता हुलकावणी…

संशयित सौरभ पवार हा गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर भादंवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल होता. अखेर नाशिक पोलिसांनी त्याला शिताफीने अटक करून पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

यांनी केली कामगिरी:

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-२ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, नंदकुमार नांदुर्डीकर, वाल्मिक चव्हाण, महेश खांडबहाले आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *