क्राईम ताज्या बातम्या

बिटको रुग्णालयात कोयत्याने वार करणारा सनी चटोले ताब्यात…. गुंडा विरोधी पथकाची कामगिरी…..

बिटको रुग्णालयात कोयत्याने वार करणारा सनी चटोले ताब्यात…. गुंडा विरोधी पथकाची कामगिरी…..



‎हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आपतकालीन विभागात कोयत्याने वार करून, धुडगूस घालुन, शासकिय कामात अडथळा आणणारा व दोन गुन्हयामध्ये फरार आरोपी सनी चटोले याला गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक यांनी नाशिकरोड येथुन घेतले ताब्यात घेतले आहे.

गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हयांचा जलद तपास करीत असताना ०८ एप्रिल रोजी रोकडोबा वाडी येथे मागील भांडणाची कुरापत काढुन फिर्यादी यांचे डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  गुन्हयातील फिर्यादी यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बिटको हॉस्पीटल औषधोपचारासाठी दाखल केले असता चटोले यांनी पुन्हा आपतकालीन विभागामध्ये  येवुन फिर्यादी यांना पुन्हा कोयत्याने मारहाण करून धुडगूस घालुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला होता.

बिटको रुग्णालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोन्ही गुन्हयामध्ये मुख्य सुत्रधार संशयित सनी चटोले याचा शोध घेत असताना २५ एप्रिल रोजी गुंडा विरोधी पथकाचे गणेश भागवत यांना  दोन्ही  संशयित सनी चटोले हा नाशिकरोड परिसरात एका चहा टपरीच्या मागे चहा पित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी गुंडा विरोधी पथकाचे  पोलिस उप निरीक्षक संदिप पवार व पथकाने त्यास सापळा लावुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून सनी चटोले याला पुढील कारवाई साठी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

‎सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलिस उप निरीक्षक संदिप पवार, पोह विजयकुमार सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, सुनिल आडके, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले,  सुनिता कवडे आदींनी यशस्वीरित्या केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *