सह्याद्री कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा….
नाशिक : सह्याद्री कॉलेज ऑफ फायर इंजिनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट, नाशिक येथे ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रथमच फायर कोर्सच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने शिस्तबद्ध परेड संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. विशेष म्हणजे या संचलनात अग्निशमन वाहन आणि ॲम्ब्युलन्सचा ताफाही सहभागी झाला होता. या आकर्षक संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमात विशेष आमंत्रित सेवानिवृत्त फ्लाईंग ऑफिसर, वायुसेना, म. रमेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सैन्य दलातील सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर म. पाटील, सेवानिवृत्त सुभेदार म. फटांगरे, सह्याद्री कॉलेजचे संचालक म. सागर देवरे, प्राचार्य म. स्नेहल देवरे मॅडम तसेच अतिरिक्त संचालक डॉ. दिलीप मेनकर प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. “शिका, मोठे व्हा, चांगले नागरिक बना आणि राष्ट्राची व समाजाची सेवा करा,” असा संदेश सेवानिवृत्त फ्लाईंग ऑफिसर रमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अभिजित बनकर, प्रा. रहाणे, प्रा. मिलिंद दर्डा, प्रा. गांगुर्डे मॅडम, प्रा. जगताप मॅडम, प्रा. दुर्गेश भामरे, पीयूष कोठावदे आणि विक्रम पारधी यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






