नाशिकला ‘पूज्य झुलेलाल वृद्धाश्रम’…. ६ नोव्हेंबर रोजी होणार उद्धघाटन…..
0
नाशिक जिल्ह्यातील सिंधी समाज बांधवांसाठी आनंदाची बातमी असून, नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशनच्या पुढाकारातून ‘पूज्य झुलेलाल वृद्धाश्रम’ सुरू करण्यात येत आहे. येत्या ६ नोव्हेंबरपासून या वृद्धाश्रमाचा शुभारंभ होणार आहे. सेवा • श्रद्धा • समर्पण हे उद्देश्य समोर ठेऊन पंचवटी परिसरातील स्थानिक हिरावाडी रोड, नंदिनी अगरबत्ती जवळील शिवम नगर येथे हा वृद्धाश्रम सुरू करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, आपुलकी, सन्मान आणि सुरक्षिततेचे वातावरण मिळावे, या उदात्त सामाजिक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सिंधी समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा वृद्धाश्रम आधाराचे केंद्र ठरणार असून, समाजातील सर्व बांधवांनी या सेवाभावी उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या ज्येष्ठांसाठी एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपण एकत्र येऊया.’ या संदेशातून समाजाने एकत्र येण्याचे आवाहन नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन च्या वतीने करण्यात असून
अधिक माहितीसाठी
राजेश गोथवानी – 8855020200
हेमानंद करमचंदानी – 9890111180
नानक केसवानी – 9623700495
दीपक लालवानी – 9822266372
मुकेश नालचा – 9850083122 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





