उमराणा ग्रामीण रुग्णालयाचा मनमानी कारभार, वैद्यकीय अधिकारी गैरहजर आरोग्य विभागाचे रूग्णालयाकडे दुर्लक्ष
उमराणा येथील ग्रामीण रुग्णालयात डाँक्टराचा हलगर्जी पणा पेशंटाच्या जिवाचां होतो खेळ उमराणे दिनांक ६ ऑगस्ट रवीवार रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान खारीपाडा येथील पॉयझन पेशंट हरी रामा माळी हे सकाळी आठ वाजेपासून ग्रामीण रुग्णालय येथे आले असता सदर रुग्णालयात डाँ. राजपूत यांची दिवटी असल्याने ते रुग्णालयात उपस्थित नसल्याचे उमराणे ग्रामस्थाच्या लक्षात अल्याने ग्रामस्थानी रुग्णालयाकडे धाव घेतली तर तिथे पेशंट ची गंभीर आवस्था दिसून आली …डाँ. कॉल केला असता त्यांनी हॉस्पिटल मधील सिस्टर मेघा पवार यांना कॉल द्वारे पेशंटला ट्रीटमेंट देण्यासाठी सांगितले व पेशंट जास्त सिरीयस असल्यास त्याला तुम्हीच रेफर करून द्या असे सांगितले .
दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार भारती पवार या मंत्री आहेत याच उमराणे गावाने त्यांना पहिल्यांदा जिल्हा परिषद साठी पाठवले . त्यांनी देवळा तालुक्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.
पेशंटचे नातेवाईक यांनी सामाजिक कार्यकर्ते निखिल बिट्टू देवरे ,संदिप देवरे भिला देवरे यांना कॉल केला व सांगितले की दोन तासापासून पेशंट सिव्हिल हॉस्पिटल आणले असता रग्णालयात डॉक्टर नाहीत म्हणून निखिल देवरे यांनी स्वतः डॉक्टरांना कॉल केला तरी ते कॉल उचलत नसल्याने त्यानंतर निखिल देवरे यांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे सचिन जाधव दादा गोधडे रोशन देवरे विपुल पवार शरद नंदाळे व व उमराणे ग्रामस्थ पेशंटचे नातेवाईका च्या वतीने रुग्णालयाला ताळा कुलूप लावण्यात आला. दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर देवळा