Homeक्राईमआयशर ट्रक चोरणाऱ्यास पंचवटी पोलीसांनी केली अटक... पंचवटी पोलीस ठाणे...

आयशर ट्रक चोरणाऱ्यास पंचवटी पोलीसांनी केली अटक… पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….

आयशर ट्रक चोरणाऱ्यास पंचवटी पोलीसांनी केली अटक… पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….

 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पंचवटी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस उप निरीक्षक अशोक काकड व नांदुर्डीकर आणि राकेश शिंदे मोबाईलने रात्रगस्त करत असतांना पहाटे ०४:३० वाजेच्या सुमारास मेरी रासबिहारी लिंकरोडने गॅस सिलेंडरच्या टाक्या भरलेला आयशर कंपनीचा ट्रक जातांना दिसला. पोलीस पथकाने चालकास थांबविण्यास इशारा केला असता, त्याने ट्रक न थांबविता तो पळून जावू लागला. गुन्हे शोध पथकाने लागलीच त्या ट्रकचा पाठलाग करून त्यास शिताफिने तलाठी कॉलनी जवळ, पंचवटी, नाशिक येथे थांबविले व चालकास पळुन जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेतले. चालकाकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव योगेश शामराव निकम असे सांगीतले.

 

त्यास ट्रक न थांबविण्याचे कारण विचारले असता, तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. म्हणुन सदरचा ट्रक त्यावरील वाहन चालक योगेश भिमराव निकम याचेसह पंचवटी पोलीस ठाणेस आणून पंचवटी पोलीस ठाण्यात आणून अधिक तपास केला असता, आयशर व त्यामधील गॅस सिलेंडरच्या टाक्या या पंचवटी पोलीस ठाण्यात २३ ऑगस्ट रोजी भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये दाखल गुन्हयातील चोरीस गेलेला माल असल्याचे निष्पन्न झाल्याने. सदरचा आयशर कंपनीचा ट्रक MH 15 GV 2544 व त्यामधील गॅस सिलेंडरचे टाक्या व ते चोरी करणारा संशयित योगेश शामराव निकम याला गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

कारवाईत एकूण ४,०४,४००/- किंमतीचा संपुर्ण मुद्देमाल ताब्यात घेवून गृन्हा उघडकीस आणला आहे.सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक बगाडे, पोलिस निरीक्षक सपकाळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, सहायक पोलिस उप निरीक्षक अशोक काकड, सहायक पोलिस उप निरीक्षक वणवे, कुलकर्णी, नाईक, भोईर, मालसाने, लोणारे, नांदुर्डीकर, शिंदे, साबळे, महाले, जाधव, पवार, पवार, वाकचौरे व कर्पे यांनी केली आहे

Advertisement

Advertisementspot_imgspot_imgspot_imgspot_img
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments