क्राईम ताज्या बातम्या

राज राजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ महिलेची दोन तोळे सोन्याची पोत खेचून चोरटे फरार……

राज राजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ महिलेची दोन तोळे सोन्याची पोत खेचून चोरटे फरार……

 

नाशिक शहरात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही, रोजच दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, दुचाकी तोडफोड करने सातत्याने सुरू असून नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील पोत खेचून चोरटे पसार झाले. राज राजेश्वरी मंगल कार्यालय जवळील संत ज्ञानेश्वर नगर, श्रीभक्ती सोसायटी, जेलरोड नाशिकरोड या ठिकाणी राहणाऱ्या  मालती अशोक वारीकर या जेवणानंतर पायी चक्कर मारत असताना दुचाकीवर आलेल्या दोन सोनसाखळी चोर भामट्यांनी अडीच तोळे सोन्याची गळ्यातील पोत गंठण हुसकावून पोबारा केला.

महिलेने आरडाओरड केली परंतु दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पल काढला. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून सी सी टीव्ही च्या आधारे सोनसाखळी चोरांचा शोध सुरू आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *