महाराष्ट्र शासनाचा “पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम” …… समस्या, तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी विशेष उपक्रम…….
नाशिक शहर पोलिस आयुक्तालय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखडया अंतर्गत “पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम” राबविणार आहेत. क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर विशेष उपक्रम राबविण्यात आले आहे. महारष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०७ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालीका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार मंत्रीमंडळाच्या उपस्थितीत संबोधीत केले.
राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आलेला असुन, त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकिय व निमशासकीय कार्यालयांकरीता आगामी १०० दिवसांमध्ये पुढील मुदयांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
१) संकेतस्थळ (Website) २) सुकर जीवनमान (Ease of Living) ३) स्वच्छता (Cleanliness) ४) जनतेच्या तक्रारींचे निवारण (Grievance Redressal) ५) कार्यालयातील सोयी व सुविधा (Amenities at work place) ६) गुंतवणुक प्रसार (Investment Promotion) ७) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Field Visits) इत्यांदी मुदयांवर नागरीकांकरीता कृती आराखडा तयार करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत कळविण्यात आले आहे. २२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस आयुक्त, नाशिक शहर तसेच सर्व पोलीस उप आयुक्त, सर्व सहा. पोलीस आयुक्त हे नागरीकांच्या तक्रारी जाणुन घेवुन त्यांचे निरसण करण्याकरीता उपस्थित राहणार आहेत.
०१) पोलिस आयुक्त संदिप कर्णिक
रामकुंड पोलीस चौकी, पंचवटी नाशिक
०२) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव
पाटीलनगर गार्डन, अंबड पोलीस ठाणे
०३) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण
परिमंडळ १
दुधबाजार पोलीस चौकी, भद्रकाली पोलीस ठाणे
०४) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ – २
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नाशिकरोड पोलीस ठाणे
०५) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी
सातपुर गाव पोलीस चौकी, सातपुर पोलीस ठाणे
०६) सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे पंचवटी विभाग
मारुती मंदिर, आडगाव गांव, आडगाव पोलीस ठाणे
०७) सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव
सरकार वाडा विभाग
कुलकर्णी गार्डन, सरकारवाडा पोलीस ठाणे
०८) सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख
अंबड विभाग
आनंदनगर पोलीस चौकी, इंदिरानगर पोलीस ठाणे
०९) सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी नाशिकरोड विभाग
१२५ शाळा, जॉगिंग ट्रॅक, उपनगर पोलीस ठाणे
१०) सहायक पोलिस आयुक्त संदिप मिटके
म्हसरूळ गांव पोलीस चौकी, म्हसरूळ पोलीस ठाणे
११) संगिता निकम सहा. पोलीस आयुक्त
शिवाजीनगर पोलीस चौकी, गंगापुर पोलीस ठाणे
१२) सहायक पोलिस आयुक्त सुधाकर सुराडकर
अशोका मार्ग सिग्नल, पोलीस चौकी जवळ, मुंबईनाका पोलीस ठाणे
१३):वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण
विशेष शाखा
भगुर पोलीस चौकी, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे
१४) वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख आर्थीक गुन्हे
भोर टाऊन शिप, जाधव सकुंल, चुंचाळे पोलीस चौकी
याठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या एकून समजून घेत त्यांचे निरसन करणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांच्या कृती आराखडया अंतर्गत नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नागरीकांच्या तक्रारी समजुन घेवुन त्याचे निरसण करण्यासाठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जास्तीत जास्त नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.