Featured ताज्या बातम्या

देवळा येथील मथुराई मेडिकल येथे चोरीचा प्रयत्न फसला….

देवळा येथील मथुराई मेडिकल येथे चोरीचा प्रयत्न फसला….

देवळा येथील शिवाजीनगर मथुराई मेडिकल आहे या ठिकाणी रात्री तीन साडेतीन च्या दरम्यान चोरट्यांनी शटर वाकून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा हा प्रयत्न शटर न उघडल्याने असफल ठरला हे सर्व दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत

देवळा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्यातर्फे देवळा पोलीस स्टेशन येथे आज पोलीस सब इन्स्पेक्टर विक्रांत कचरे यांना असोसिएशन कडून निवेदन देण्यात आले या निवेदनात चोरांचा तपास करून चोरांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे यावेळी नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश निकम ,देवळा तालुका अध्यक्ष पंकज आहेर ,शहराध्यक्ष रितेश आहेर ,सचिव प्रवीण खरोटे ,भगवान मेतकर ,केतन पवार ,तेजस आहेर ,अमोल निकम ,तुषार काकुळते, शरद शिंदे, गणेश देवरे आदि सह बहुसंख्य मेडिकल दुकानदार हजर होते.दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर देवळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *