Homeक्राईमअंबड हत्या प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना २४ तासात पोलिसांनी केली अटक
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

अंबड हत्या प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना २४ तासात पोलिसांनी केली अटक

अंबड येथील मयूर केशव दातीर या वीस वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणातील आरोपी करणअण्णा कडूसकर, मुकेश मगर आणि रवींद्र आहेर यांना २४ तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंबड आणि गुन्हे शाखेच्या पथकाने मोखाडा (जि. ठाणे) येथून या तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे.

गुरूवारी दुपारी अंबडच्या हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली होती. दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाल्यानंतर या तिन्ही आरोपींनी धारदार शस्त्राने मयूरची हत्या केली आणि नंतर तेथून फरार झाले होते. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ.सीताराम कोल्हे, शेखर देशमुख, अंबडचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा कसून तपास केला व आरोपींचा शिताफिने शोध घेतला. हल्लेखोर सापडत नाही तोपर्यंत मयूरचे पार्थिव ताब्यात घेणार नाही असा पवित्रा अंबडवासियांनी घेऊन पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांच्या तपासास अधिक वेग आला होता. हल्लेखोर त्र्यंबकेश्वरमार्गे मोखाडा येथे गेल्याची माहिती मिळताच अंबड व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments