क्राईम ताज्या बातम्या

नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन ०६ महिन्यांकरीता तडीपार असलेला इसम अटक….. गुन्हेशाखा युनिट-२ ची कामगीरी

नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन ०६ महिन्यांकरीता तडीपार असलेला इसम अटक….. गुन्हेशाखा युनिट-२ ची कामगीरी……

नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन ०६ महिन्यांकरीता तडीपार असलेला सनी भाटिया याला अटक करून गुन्हेशाखा युनिट-२ ने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. ३० सप्टेंबर रोजी सहायक पोलिस उप निरीक्षक शंकर काळे व सहायक पोलिस उप निरीक्षक बाळु शेळके यांना नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन हददपार केलेला सन्नी भाटीया हा गुलजारवाडी, सुभाषरोड, नाशिकरोड येथील त्याच्या घराजवळ उभा असल्या बाबत गोपनीय बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचुन हद्दपार इसम राहुल उर्फ सन्नी शाम भाटीया वय-२७ वर्ष, रा. गुलजारवाडी, सुभाषरोड, नाशिकरोड याला शिताफिने ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी नाशिकरोड पोलीस ठाणे येथे वर्ग केले आहे.


सदरची कामगीरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र २ चे सहायक पोलिस निरीक्षक समाधान हिरे, सहायक पोलिस उप निरीक्षक शंकर काळे, बाळु शेळके, विलास गांगुर्डे, राजेंद्र घुमरे, प्रकाश भालेराव, सुनिल आहेर, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, संजय पोटींदे आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *