सांई कालीराम महाराज उद्या नाशिक मध्ये……”गुरु बिना गत नहीं और शाह बिना पत नहीं”
उल्हासनगर येथील सांई वसण घोट दरबार चे संत श्री कालीसांई शुक्रवारी २२ मार्च रोजी नाशिकला येत असून राजपाल परिवार यांच्या सुखमनी मनोहर गार्डन येथील निवस्थानी दुपारी कालीसांई महाराज यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता पूज्य बहीरणा साहिब पूजा होणार आहे. त्यापूर्वी दुपारी १२ वाजता नाशिक ए बी बी सर्कल येथील प्रसिद्ध मुहूर्त मॉल याठिकाणी कालीसांई महाराज यांचे आगमन झाल्यानंतर राजपाल परिवारातर्फे स्वागत सत्कार होणार आहे.
सायंकाळी ५ वाजता नाशिकरोड येथील दिव्या कलेक्शन या भव्य मॉल येथे भाविकांना दर्शन देणार आहेत. भाविकांनी कालीसांई यांच्या दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजपाल परिवाराने केले आहे. राजपाल कुटुंब तसेच भाविक श्री कालीसांई महाराज यांची आतुरतेने आगमनाची वाट पाहत आहे.