गांजा विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद……
गांजा विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद पोलिसांनी १,६०,०००/- रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. २८ सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की सागर सोमनाथ बलसाने, वय-२६ वर्षे, रा. घर नं. ११७१, नाशिक सेंट्रल मार्केट, टॅक्सी स्टॅण्ड जवळ, मातंगवाडा, भद्रकाली, नाशिक, सनी किशोर देवाडिना, वय-३० वर्षे, हल्ली रा. श्री. आंबेकर यांचे घरात भाडयाने, मधली होळी, जुने नाशिक मुळ रा. नाशिक सेंट्रल मार्केट, टॅक्सी स्टॅण्ड जवळ, मातंगवाडा, भद्रकाली, नाशिक वांती त्यांचे ताब्यात अंदाजे १,६०,०००/- स. किंमतीचा १५ किलो १६१ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या स्वतःच्या कब्जात बाळगुन असल्याची माहिती मिळाली.
पथकातील अधिकारी व अमालदरांनी शिताफीने त्यांचे ताब्यातील मुददेमाल जप्त करून, नमुद आरोपीविरूध्द भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत.संशयित आरोपी सागर सोमबाय बलसाने याचेवर यापुर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सहायक पोलिस आयुक्त संगिता निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिला कोल्हे, पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, सहायक पोलिस उप निरीक्षक रंजन बेडाळे, सहायक पोलिस उप निरीक्षक संजय ताजने, भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, अनिरूध्द वेवले, बाळासाहेब नांद्रे, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने कामगिरी केली आहे.