शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान….. रोटरी क्लब ऑफ नाशिकरोड यांचे वतीने कार्यक्रम संपन्न…..
रोटरी क्लब ऑफ ना. रोड यांचे वतीने “Nation Building Awards”, हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा २८ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५.०० वा. के. जे. मेहता हायस्कुल ना. रोड येथील शोभेन्दू सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी एकूण ३५ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिपक आहिरे सर यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपून शिक्षक बांधवांनी भावी पिढीला घडविण्यासाठी आपले मोलाचे योगदान देणे गरजेचे असते. असे शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका पालकांइतकीच महत्वपूर्ण असते. म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रात अतुलनिय कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब असे स्तुत्य उपक्रम राबवित असतात. सदर कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ ना. रोड चे अध्यक्ष ओम प्रकाश श्रीवास्तव, सेक्रेटरी डॉ. विक्रांत किवांडे, यांच्या सह सर्व सदस्य कुणाल शर्मा, प्रशांत बिशोई, विकास दिघे, निलमा सावंत, दिलीप दिघे, बालकिशन शाहू, दिपक पडवळकर, श्रीकांत पगारे, डॉ. रोचना रॉय, विनस वाणी, ग्यानेश वर्मा, समृत्ती दास, वैष्णवी पगारे, तुषार म्हस्के ह्या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.