ताज्या बातम्या राजकारण

भारतीय सिंधु सभेची सर्वसाधारण बैठक संपन्न…..

भारतीय सिंधु सभेची सर्वसाधारण बैठक संपन्न…..

नाशिक भारतीय सिंधू सभेची सर्वसाधारण बैठक नाशिक क्लब येथे संपन्न झाली. भारतीय सिंधु सभा चे शहर अध्यक्ष किशन आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत सिंधी समाजात भरीव काम करण्यासाठी सर्व सभासदांनी एक मताने होकार दिला. समाजात कुणाच्या घरी  निधन झाल्यास त्यांना सर्वतोपरी मदत पोहोचवण्यासाठी भारतीय सिंधु सभा कटिबद्ध असून समाजात शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय दृष्ट्या गरज असल्यास त्यांना सर्वतोपरी मदत भारतीय सिंधु सभा नाशिक विभाग पोहोचवणार आहे.

बैठकीत भविष्यात होणाऱ्या विविध कामांबाबत यावेळी अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी भारतीय सिंधु सभा चे जिल्हा अध्यक्ष राजेश गोधवानी, नाशिक शहर अध्यक्ष किशन अडवाणी, उपाध्यक्ष हरीश कटारिया, उपाध्यक्ष किशन परमानी, महामंत्री अशोक पंजाबी, सेक्रेटरी जमनदास पुरस्वनी, सेक्रेटरी सतीश दर्यानी, युवा सेना अध्यक्ष दिनेश साधवानी, सल्लागार दीपक तोलानी, मुकेश वालेचा सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *