राष्ट्रवादी काँग्रेस सिंधी समाज सेल राज्य प्रमुखपदी रतन चावला……
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी सिंधी समाज सेल राज्यप्रमुख या पदावर रतन चावला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी कार्य रतन चावला करीत असून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी रतन चावला प्रयत्नशील आहेत.
नियुक्तीचे पत्र नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नाशिक तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे, कार्याध्यक्ष कचरु पाटील-तांबेरे, जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती कापसे, देवळाली कॅम्प अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आडके, उपाध्यक्ष रविंद्र भदाणे, अशोक जाधव, ज्ञानेश्वर जाधव, गोविंदराम काच्छेला, मनोहर मारवीजा, सुनिल निहलानी, कन्हैयालाल मारवीजा आदी उपस्थित होते.
रतन चावला यांच्या सिंधी समाज सेल राज्य प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने सिंधी समाजात आनंदाचे वातावरण आहे. नियुक्तीबद्दल चावला यांचे समाज बांधवांकडून अभिनंदन होत आहे.