एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या
भाच्याने घेतला मामीचा बळी
नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या एकलहरा गेट नवीन सामनगाव रोड या ठिकाणी काल महिलेचा खून करण्यात आला होता त्याची उकल नाशिक रोड पोलिसांनी काही तासातच लावल्यानंतर सदर महिलेचा खून तिच्या भाच्याने केल्याचे उघड झाले हा खून अनैतिक संबंधातून आणि एकतर्फी प्रेमातून झाल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे. या संदर्भात नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर आर शेळके यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सामनगाव रोडवर राहणारी क्रांती बनेरिया ही तिचा पती आणि मुलांसमवेत भाच्या बरोबर राहत होती. तिच्या पतीच्या बहिणीचा मुलगा(भाचा) त्यांच्या समवेत उदरनिर्वाह करत असे. 6 मार्च च्या मध्यरात्री क्रांती बनेरिया हिच्या भाचा अभिषेक राजेंद्र सिह याने झालेल्या वादातून सदर महिलेच्या गळ्यावर चाकू ने वार केले. त्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्याभोवती चाकू फिरवून स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रयत्न बनाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले असून या संदर्भात पोलिसांनी तांत्रिक संसाधनांचा वापर करून तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासातच सदर महिलेच्या पतीचा सख्खा भाचा अभिषेक याने हा खून केल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे. या संदर्भात सुदाम बनेरिया याने नासिक रोड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात नाशिक रोड पोलीस अधिक तपास करीत आहे.