नाशिकरोड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी योगेश गाडेकर……
नाशिकरोड जेलरोड शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्षपदी योगेश गाडेकर यांची निवड करण्यात आली. शिवजन्मोत्सव सोहळा समितीची बैठक शिवाजी हांडोरे यांच्या अध्यक्षखाली कदम लॉन्स, नाशिकरोड येथे संपन्न झाली होती.
यावेळी अध्यक्षपदी योगेश गाडेकर, कार्याध्यक्षपदी सुनील सोनवणे, उपाध्यक्षपदी राहुल लवटे, विशाल सातभाई यांची नियुक्ती करण्यात आली. यासह खजिनदार अभय खालकर, सरचिटणीस प्रशांत भाऊ कळमकर, चिटणीस गोकुळ नागरे, यांची निवड करण्यात आली. यावेळी कांचन जगताप, संगीता गायकवाड, सुवर्णा काळुखे, माजी नगरसेवक, सूर्यकांत लवटे, विशाल संगमनेरे, माजी अध्यक्ष बंटी भागवत, राजेश फोकणे, विक्रम कोठुळे, किशोर जाचक, जयंत गाडेकर, नितीन चिडे, श्रीकांत मगर, बाळासाहेब म्हसके, नितीन पाटील, सुनील पाटोळे, संतोष शिरसागर, शरद जगताप, अतुल धोंगडे, स्वप्निल शहाणे, वैभव वाळेकर, प्रशांत बारगळ आदी उपस्थित होते.