Homeक्राईमगुंडा विरोधी पथकाने नाशिक इग्स् प्रकरणातील फरार आरोपीला केले जेरबंद.....

गुंडा विरोधी पथकाने नाशिक इग्स् प्रकरणातील फरार आरोपीला केले जेरबंद…..

गुंडा विरोधी पथकाने नाशिक इग्स् प्रकरणातील फरार आरोपीला केले जेरबंद…..

नाशिक ड्रग्स् प्रकरणातील फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद केले आहे. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी नाशिकरोड पोलीस ठाणे हद्यीत म्हाडा बिल्डींग जवळ सामनागाव रोड येथे संशयित गणेश संजय शर्मा हा एम.डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर संशयित इसमास म्हाडा बिल्डींगचे गेट समोर अश्विनी कॉलनी कडे जाणारे रस्त्याचे कडेला, सामनगाव रोडजवळ नाशिकरोड येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२.०५ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ अंदाजे किंमत ५०,०००/- रुपये बेकायदेशीर रित्या स्वतःचे कब्जात बाळगला म्हणुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २२ प्रमाणे दिनांक ०७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास विशेष पथकातील अंमली पदार्थ विरोधी पथक, नाशिक शहर हे करीत असुन सदर गुन्हयाच्या तपासात प्रथमेश संजय मानकर याचे नाव निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेण्याकरिता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक त्याअनुषंगाने तपास करीत असताना सराईत आरोपी प्रथमेश संजय मानकर हा गुन्हा झाले पासुन आपले अस्तीत्व लपवुन परराज्यात पळून गेला होता. तो सिन्नर फाटा येथे येणार असल्याची गोपनीय बातमी विशेष पथकातील गुंडा विरोधी पथकाचे प्रदिप ठाकरे यांना मिळाली असता सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देवुन पथकातील अंमलदार यांनी अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिक येथुन गुन्हयातील आरोपी प्रथमेश संजय मानकर वय २१ वर्षे रा. फ्लॅट नं ०२, ईश्वरशक्ती बिल्डींग, जगताप मळा, तरण तलाव जवळ, नाशिक यास दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेतले. पुढील तपासकामी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, मिलीन जगताप आदींनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments