जयभवानी रोड येथील फायरिंग मधील आरोपी ताब्यात….. गुंडा विरोधी पथकाची कारवाई……
दोन गँग मधील वर्चस्ववादातुन झालेल्या फायरींग मधील आरोपी दोन गावठी कट्टयासह १२ तासाच्या आत गुंडा विरोधी पथकाने जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १० जुलै रोजी रात्री सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल व त्याचे विरोधक सराईत गुन्हेगार रोहित डिंगम उर्फ माले, टक्या उर्फ सनी पगारे, इरशाद चौधरी, बारक्या उर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाठे यांनी एकमेकांविरोधात एकमेकांच्या टोळीच्या वर्चस्वावरुन व हप्ते जमा करण्यावरुन वादविवाद करुन सार्वजनिक जागेत लाकडी दांडके, व धारधार शस्त्रानिशी जावुन दहशत निर्माण करुन एकमेकांवर गावठी कट्टयाने फायरींग करुन परिसरात दहशत निर्माण केली तसेच रोहित डिंगम व त्याचे साथिदारांनी राहुल उज्जैनवाल याची काकु जस्लीन हिच्या घरावर दगड व बिअरच्या बाटल्या फेकून गंभीर स्वरुपाचा गुन्हा करुन पळून गेले होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दोन गैंग मधील वर्चस्ववादावरुन झाला असल्याने या गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गुंडा विरोधी पथकाचे दोन पथके तयार करुन गुन्हयातील आरोपींच्या ठावठिकाणा व त्यांचे मित्र परिवार यांची माहिती काढण्यास सुरुवात केली असता गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर मोहिते, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव यांना केरु पाटील नगर, जेलरोड, नाशिक येथे एक चारचाकी वाहन त्याची मागील काच फुटलेली अशी संशयीत रित्या उभी असल्याची माहिती मिळाली.
संशयित्रीत्या उभ्या असलेल्या वाहन दिसुन आल्याने पथकाने सदर वाहनाजवळ कोणी आहे का म्हणुन लक्ष ठेवुन असतांना थोड्या वेळात एक इसम गाडी जवळ आल्याने पथकाने शिताफीने ताब्यात घेतल्यानंतर तपासात तो गुन्हयातील इरशाद चौधरी होता. त्याचेजवळ असलेल्या मारुती कंपनीची स्विफ्ट कार एम.एच. १५ डी.सी. ७०९९ मध्ये दोन देशी बनावटीचे पिस्टल व एक फायर झालेला राउंडचा तुकडा मिळुन आला असुन घडलेल्या प्रकारात ती गाडी व दोन देशी बनावटीचे पिस्टल वापरल्याचे निष्पन्न झाल्याने संशयित इरशाद मोहम्मद अली चौधरी वय-२९ वर्षे रा. एवर स्विट अपार्टमेंट, फ्लॅट नं ७, रजा कॉलनी, देवळाली गाव, नाशिकरोड, नाशिक याचे ताब्यातुन एक मारुती कंपनीची स्विफ्ट कार एम.एच. १५ डी.सी. ७०९९, दोन देशी बनावटीचे पिस्टल व एक फायर झालेला राउंडचा तुकडा, एक मोबाईल फोन असा एकुण ३ लाख, ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनिता कवडे आदींनी कामगिरी पार पाडली आहे.