Homeक्राईमएकलहेरे रोडवर पुन्हा खून..... पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा खून......
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

एकलहेरे रोडवर पुन्हा खून….. पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा खून……

एकलहेरे रोडवर पुन्हा खून…..
पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा खून……

एकलहेरे रोड येथील सामनगाव येथे राहणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा अज्ञात इसमांनी घरात घुसून खून केला. क्रांती बनेरिया वय २५ या महिलेच्या गळ्यावर चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही दिवसांपूर्वीच एकलहेरे रोडवर एका युवकाचा खून करण्यात आला होता त्या घटनेचा विसर होत नाही आणखीन एक खून झाल्याने नाशिकरोड परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. सुदाम रामसिंग बनेरिया हा पाणीपुरी विक्री करून उदरनिर्वाह करीत असतो काल दुपारी 4 वाजेपासून रात्री 9.30 पर्यंत ते एकलहेरे मेनगेट नाशिकरोड येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होता.

त्यावेळी त्याची पत्नी क्रांती बनेरिया (वय 25) ही फिर्यादीचा भाचा अभिषेक (वय 22) हे दोघे घरात होते. अज्ञात इसमांनी अज्ञात कारणासाठी बनेरिया यांच्या घरात प्रवेश करुन क्रांती बनेरिया हिच्या गळ्यावर चाकूचे वार करून जीवे ठार मारले तर फिर्यादीचा भाचा अभिषेक याला मारहाण व गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी सुदाम रामसिंग बनेरिया यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments