क्राईम ताज्या बातम्या

उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात

उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात…

१६ फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी मयुर विजय रोहम हे थांबले असतांना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधुन आलेल्या संशयितांनी फिर्यादी यांना पकडुन मागील भांडणाची कुरापत काढुन मयुर बेद व रोहित महाले यांचे विषयी विचारपुस करु लागल्याने फिर्यादी यांना हाताच्या बुक्क्याने पोटात व छातीत मारले तसेच हातातील धारदार चॉपरने जीव घेण्याच्या उद्देशाने वार केले होते. उपनगर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील फरार असलेला संशयित आरोपी गुन्हे शाखा युनिट-2 कडून ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट-2 चे प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली कि उपनगर पोलिस ठाण्यातील कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल गुन्ह्यातील फरार संशयित प्रदीप उर्फ सोनू सोमनाथ कापसे वय 28 रा. एकलहरा पहाडीबाबा  झोपडपट्टी  हा एकलहरा  परिसरात असले बाबत माहिती मिळाली होती.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त पोलीस उप आयुक्त सिताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक  विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २  चे सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहायक पोलिस उप निरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, प्रकाश भालेराव,विशाल पाटील सुनिल आहेर  यांनी एकलहरा येथून फरार आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वैद्यकीय तपासणी करून उपनगर पोलीस ठाणे ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *