जय भवानी रोडला बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात कैद……
नाशिकरोड भागातील जयभवानी रोड, पाटोळे मळा येथे रात्री दोन वाजेच्या सुमारास एक बिबट्या वन विभागाने लावलेले पिंजऱ्यात बंदिस्त झाला आहे.
जय भवानी रोड, आर्टिलरी सेंटर रोड, रोकडोबावाडी, अण्णा गणपती मंदिर या भागात बिबट्या वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येत होते.
बिबट्याची दहशत वाढल्याने येथील शिवसेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या योगिताताई गायकवाड यांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली केल्यानंतर अर्टलरी सेंटर गेट, पाटोळे मळा या भागात पिंजरा लावण्यात आला.आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास एक बिबट्याचे बछडे पिंजऱ्यात कैद झाले आहे परंतु मादी ही अद्यापी मोकाट असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
वन विभागाने बछडे सुखरूप ताब्यात घेतले असून मादी बंदिस्त करण्यासाठी दुसरा पिंजरा लावण्यात आला आहे. कालच पिंपळगाव खांब येथे अभिषेक या लहान मुलावर बिबट्याने हल्ला केला होता, अभिषेकने पाण्याचा भरलेला डब्बा बिबट्याच्या तोंडावर मारल्याने बिबट्या पाळला आणि सुदैवाने अभिषेक वाचला. त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे.