Homeक्राईमअंबड व उपनगर येथील दोन गुंडावर हद्दपारीची कारावाई.......

अंबड व उपनगर येथील दोन गुंडावर हद्दपारीची कारावाई…….

अंबड व उपनगर येथील दोन गुंडावर हद्दपारीची कारावाई…….

 

शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणत गुन्हेगारीवर आला घालण्यासाठी पोलिस आयुक्तांकडून कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली असून अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात समाधान उर्फ सॅम अशोक बोकड, वय २३, रा. तिरडशेत माउली मंदिरा जवळ, सातपूर, नाशिक, पंकज अशोक मोरे, वय २९, रा. सोनवणे बाबा चौक, साधु महाराज आश्रम शेजारी, | समतानगर, आगरटाकळी, नाशिकरोड, नाशिक या दोघांना तडीपार करण्यात आले आहे. समाधान आणि पंकज यांनी अंबड व उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दहशत कायम रहावी यासाठी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करून नागरिकांची लुटमार करणे, घातक हत्याराने मारहाण करून गंभीर दुखापत करणे, विनय भंग करणे, घराला व मोटर सायकलला आग लावून नुकसान करून नागरिकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.

 

दोघांनी नाशिक शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत केल्याने त्यांचे विरुध्द पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलिस उपायुक्त  मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त, शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दोघांविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणा-या व समाज स्वास्थ्य बिघडवणा-या गुन्हेगार इसमांचा गुन्हयांचा अभिलेख संकलित करण्याचे कामकाज चालू असून त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार तडीपार व एमपीडीए कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहेत. ऑगस्ट महिन्यात १४ इसमांविरुध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.

 

आत्तापर्यंत चालू वर्षात परिमंडळ २ हद्दीतून ४९ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे तसेच आत्तापर्यंत चालू वर्षात परिमंडळ २ हद्दीत हद्दपार आदेशाचे उल्लंघन करतांना मिळून आले म्हणून एकुण ०९ गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हद्दपार इसमांना वेळोवेळी चेक करून नाशिक शहर व जिल्हयात सापडल्यास त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments