मनमाड शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मनमाड पोलिसांनी शहरातील दत्तमंदिर रोडवरील शीख धर्मियांच्या मोठा गुपतसर गुरुद्वारा बाहेर लावलेल्या एका दुकानातून २३ अवैध तलवारी तसेच एका तरुणाचे ताब्यातून ०१ असा एकुण २४ अवैध तलवारीचा शस्त्रसाठा जप्त केला
याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्हयात अवैध २४ तलवार एक मोटारसायकल असा एकुण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे… सदर प्रकरणी संदीप बाळासाहेब पवार , आत्माराम, या दोन इसमांना तलवार बाळगतांना तसेच विक्री करतांना आढळून आल्याने ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अप्पर अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोली नाईक गणेश नरोटे, गौरव गांगुर्डे, राजेंद्र खैरनार आदींनी केली.