खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपी सह पाच आरोपी अवघ्या तिन तासात ताब्यात………
अंबड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी …….
अंबड येथे आज झालेल्या भाजिविक्रेत्याचं खुनाचे आरोपी पोलिसांनी अवघ्या तीन तासात अटक करून उत्कृष्ट कामगिरीकरून सर्व सहा आरोपींच्या मुसक्या आवळ्लया २४ ऑगस्ट रोजी सांयकाळी ०५.०० वाजेच्या सुमारास शिवाजी चौक, भाजी मार्केट, सिडको, नासिक या ठिकाणी जुन्या भांडण्याच्या कारणावरुन संदिप प्रकाश आठवले वय २२ राहणार दत्त चौक, सिडको, नासिक याला आठ संशयितांनी तिन मोटार सायकलवर येवुन धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले होते. त्यात तो उपचारा दरम्यात सिव्हील हॉस्पीटल नासिक येथे मयत झाला. संदीप चा चुलत भाऊ सनि राजु आठवले यांच्या फिर्यादी वरुन अंबड पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०२, १४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६ आदी कलम अंतर्गत ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी व इतर या आरोपीतां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचे घटनास्थळी पोलिस उप आयुक्त प्रशात बच्छाव, पोलिस उप आयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक अशोक नजन, पोलीस निरीक्षक मनोहर कारडे, पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने तात्काळ परिमंडळ दोन मधिल अधिकारी व अमलदार यांची तिन पथके व गुन्हे शाखेचे तिन पथके आरोपीचा शोधासाठी तात्काळ रवाना केले.
पोलीस उप आयुक्त गुन्हे व पोलीस उप आयुक्त परिमंडल २ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हयातील मुख्य आरोपी ओम प्रकाश पवार उर्फ मोटा ओम्या खटकी, ओम चौधरी उर्फ छोटा , साईनाथ गणेश मोरवाटे उर्फ मंगी मो-या, अनिल प्रजापत, विधीसंग्रश बालक या आरोपींना अवया तिन तासात ताब्यात घेतले
असुन इतर आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. सदरची उत्कृष्ठ कामगिरी अंबड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाप, एम.आय.डी.सी. पोलीस चौकीचे प्रभारी मनोहर कोरडे, पोलीस निरीक्षक अशोक नजन, पोलीस उप निरीक्षक संदिप पवार, रविद्रकुमार पानसरे, पवन परदेशी, जनार्दन ढाकणे, अर्जुन कांदळकर, किरण सोनवणे, सुरेश जाधव, सचिन कारजे, कुणाल राठोड, समाधान शिंदे, तुषार मते, अनिल गाढवे, दिपक शिंदे आदींनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.