नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे यंदाचे कार्यसन्मान पुरस्कार जाहीर…… मान्यवरांच्या हस्ते ३ मार्च रोजी होणार वितरण
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही *कार्य सन्मान* पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सोहळ्याचे यंदाचे हे २७ वे वर्ष आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, ऑडिओ व डिजिटल मीडिया त्याचप्रमाणे विविध सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती व संस्थांना हे पुरस्कार घोषित करण्यात येतात. यात गेल्या ४० वर्ष संपादन क्षेत्रातील सर्वसमावेशक प्रदिर्घ कार्याची विशेष दखल घेत ज्येष्ठ पत्रकार विश्वास मदाने यांना *जीवनगौरव* पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिकरोड येथील शोभेंदू सभागृह, के.जे. मेहता कॉलेज, डावखरवाडी, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहावे.
कार्य सन्मान पुरस्कार प्राप्त पत्रकार नावे पुढीलप्रमाणे आहेत.
सुनील पवार, फारूक पठाण, अजहर शेख, विकास गामने, ज्ञानेश्वर वाघ, हेमंत घोरपडे, जितेंद्र तरटे, सुधीर उमराळकर, दीपक कणसे, धनंजय बोडके, सुधीर कुलकर्णी, यतिश भानू, कुमार कडलग, चंदन खतेले, भूषण मिटकरी, मयूर बारगजे, सोनू भिडे, महेश महाले, आकाश येवले, खुशाल पाटील, भगवान पगारे, भरत गोसावी, इसाक कुरेशी, पवन येवले, किरण नाईक, रवींद्र एरंडे, अमित कबाडे, तुषार ढेपले, कमलाकर तिवढे, किशोर बेलसरे, गुलाबराव ताकाटे, शुभम पाटील, उमेश अवणकर, गौतम संचेती व भगवान थोरात. पुरस्कार प्राप्त व्यक्ती व सामाजिक संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत दत्ता शेळके – संघटक नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत, डॉ. संदेश बैरागी, API संजोग टिपरे, ऍड. गोरक्षनाथ चौधरी व दिपक डोके तसेच आकाशवाणी केंद्र नाशिक, शहर गुंडा विरोधी पथक, पोलिस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, महिला विकास सामाजिक संस्था नाशिक, संत गाडगेबाबा सेवाभावी स्वच्छ भारत अभियान नाशिक, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक, युथ एजुकेशन अँड वेल्फेअर सोसायटी नाशिक, ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच नाशिक व छत्रपती सेना संघटन यांचा गौरव केला जाणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालय येथे झालेल्या कार्यसन्मान पुरस्कार समिती बैठक प्रसंगी पत्रकार संघाचे मार्गदर्शक व जिल्हा सरचिटणीस दिनेशपंत ठोंबरे, तालुकाध्यक्ष अध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष सौ. सुनीता पाटील व पंकज पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, सह सरचिटणीस अब्दुल कादिर, खजिनदार प्रवीण गोतीसे, सह खजिनदार तेजश्री उखाडे, संघटक भैय्यासाहेब कटारे, सहसंघटक जनार्दन गायकवाड, समन्वयक विश्वास लचके, मंगलसिंह राणे, तौसिफ शेख, वकार खान, दिनेश पगारे आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.