नाशिकरोडला दोन दिवसात दोन खून…… चार दिवसांपूर्वी दाखल होती हरवल्याची तक्रार…… चार संशयित ताब्यात…….
नाशिकरोड परिसरातील उपनगर पोलिस ठाणे हद्दीत सोमवारी एका महिलेचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळीच एकलहरे परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. चोवीस तास होत नाही दुसरा मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. परभणी बीड येथील एक महिला बेपत्ता होती हरवलेल्या महिलेचा उपनगर पोलीस शोध घेत असताना आज अचानक तिचा मतदेह नाशिक पुना रोड गुरुद्वारा समोरील एका अर्धवट असलेल्या बांधकाम साइट वर मिळून आला. उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या एल आय सी रोडवर हरवलेल्या एका महिलेचा मृतदेह इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका डबक्यात गोणी मध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला. उपनगर पोलीस ठाण्यात विवाहित सोनाली भानुदास काळे ही महिला हरवल्याबाबत तिच्या कुटुंबीयांनी तकार दाखल केली होती.
घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे समजते. दोन दिवसात दोन खुनाच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सततच्या खूनांच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले असून गुन्हेगारांचा हैदोस कमी होणार का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. प्राथमिक दृष्ट्या हरवलेल्या या विवाहितेचा खून झालेला असावा तसेच मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिचा पती सासू-सासरे दीर व दिराची बायको हे सतत तिच्या सोबत भांडण करून तिला मारहाण करत होते व यांनीच काहीतरी बरे वाईट केले असल्याचा संशय व्यक्त केल्याने या चार जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच हत्या आहे की नाही हे समजू शकेल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.