वासु शेठ कारडा यांचे निधन…..
नाशिकरोड येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि समाजसेवक वासुदेव जग्गुमल कारडा यांचे निधन झाले. नाशिकरोडला पूज्य झुलेलाल यांची १९९० च्या काळात समाजबांधवांसह मिळून मिरवणूक काढणे, नाशिकरोडला पूज्य झुलेलाल मंदिर उभारणे, झुलेलाल पतसंस्था वाचविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते.

श्री.वासुदेव कारडा यांच्या निधनाने सिंधी समाजाला मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहीण, दोन मुले, तीन मुली, नातू नातवंडे मोठा परिवार आहे.वासुदेव कारडा यांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी १२ वाजता ऋषिकेश अपार्टमेंट, राठी मेडिकल जवळ, धोंगडे नगर येथून देवळाली गाव अमरधाम येथे होणार आहे.

