क्राईम ताज्या बातम्या

माजी नगरसेवकाच्या मुलावर हल्ला…… किरकोळ जखमी….

माजी नगरसेवकाच्या मुलावर हल्ला…… किरकोळ जखमी….

देवळाली कॅम्प प्रभाग क्रमांक ३ चे माजी नगरसेवक भगवान कटारिया यांचे सुपुत्र हीतेन याच्यावर दोन जणांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना रवीवारी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. हल्ल्यात हितेन कटारिया यय- 20 वर्षे, चंदा शिक्षण, राहणार- रवी सोसायटी लॅमरोड देवळाली कॅम्प हा किरकोळ जखमी झाला असून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात हितेन यांच्या तक्रारीवरून मुख्या उर्फ मुज्जफर खान रा. आईडके नगर दे. कॅम्प आणि लढ्या या दोघांविरुद्ध भा.द.वि कलम ३२३,३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हितेन हा सार्वजनीक मुतारीतुन बाहेर येत असतांना फिर्यादी व लडडया यांचा एकमेकांना धक्का लागल्याने या करणावरूण कुरापत काढुन फिर्यादी त्यांचे वडील नगरसेवक यांच्या बरोबर त्यांच्या नॉवेल्टी स्टोअर या दुकानासमोर उभे असतांना फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असतांना फिर्यादी यांना सोडविण्यासाठी त्यांचे वडील आले असता त्यांना देखील वाईट साईट शिवीगाळ करून तु अमच्या टारगेटवर आहे तुझेकडे बघुन बघुन घेतो असा दम देऊन मुख्या उर्फ मुज्जफर खान याने त्याच्या हातातील काहीतरी धारदार वस्तुने फिर्यादी यांचे तोंडावर मारले असता हीतेण त्याचा फटका वाचविणण्याच्या प्रयत्नात असतांना सदरची धारदार वस्तु हितेनच्या दोन्ही डोळ्याच्या मधे भोवडच्या खाली नाकावर लागुन सदर ठिकाणी दुखापत झाली आहे.

भगवान कटारिया यांचे देवळाली कॅम्प जुने बस स्टँड मागे नोवेल्टी स्टोअर दुकान असुन हितेन हा अधून मधून दुकानावर वडीलांना मदत करण्यासाठी जात असतो 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 19/15 वाजेच्या सुमारास तुघुशंका लागल्याने हितेन लघवी करण्यासाठी मुल्ला कॉम्पेक्स येथे लघवी करून बाहर रस्त्यावर येत असतांना मुख्या उर्फ मुज्जाफर खान याचा धक्का लागला त्याने मुल्ला याने तू कोण आहेस येथल भाई आहे काय असे म्हणून वाद घालून मारहाण करीत हल्ला केला. दोघां संशयितांविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *