क्राईम ताज्या बातम्या

देशी बनावटीची पिस्टल व काडतुस बाळगणारा युवक ताब्यात…… गुन्हे शाखा २ ची पुन्हा नाशिकरोड परिसरात कारवाई

देशी बनावटीची पिस्टल व काडतुस बाळगणारा युवक ताब्यात…… गुन्हे शाखा २ ची पुन्हा नाशिकरोड परिसरात कारवाई……

शहरात घातक हत्यारे बाळगणारे गुन्हेगारांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. महिन्याभरात अनेक गुन्हेगारांना पकडुन त्यांच्याकडून कोयते, पिस्टल आदी हत्यारे जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखा २ ने जिवंत काडतूस बाळगणारा युवक ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार विशाल कुवर व समाधान वाजे यांनी २५ मार्च रोजी सापळा रचून प्रथमेश नेल्सन कसबे, वय-२५ राहणार आकाश वीर गॅस एजन्सी समोर, पवारवाडी, सुभाषरोड, नाशिकरोड यास एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस बाळगतांना नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून २५५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट. २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहायक पोलिस उप निरीक्षक विवेक पाठक, मनोहर शिंदे, स्वप्नील जुंद्रे, विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, तेजस मते, सुनिल आहेर, प्रकाश महाजन यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *