Homeअपघातपळसे गावात रिक्षा अपघातात चालकाचा दुर्दैवी मृत्यू.......
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

पळसे गावात रिक्षा अपघातात चालकाचा दुर्दैवी मृत्यू…….

पूणे नाशिक महामार्ग वरील पळसे
गावात भीषण रिक्षा अपघातात रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तम भानुदास शेजूळे (वय 42) राहणार जेतवन नगर, नाशिकरोड असे या रिक्षा चालकांचे नाव असून उत्तम मित्र रघुवीर सन्नीराम लोहट याच्या सोबत रिक्षा क्र MH 15FV 8928 मधून सोमवारी रात्री ढाब्यावर जेवण करण्यासाठी शिंदे गाव टोलनाकाच्या पुढे गेले होते. जेवण करुन पुन्हा घरी नाशिकरोडकडे येत असताना पूणे नाशिक महामार्ग वरील पळसे गाव येथील त्रिमूर्ती प्लाझा समोर स्पीड ब्रेकरवर चाललेल्या मालवाहतूक करणारा आयशर ट्रकला क्र MH 15 EG 1245 याला रिक्षाने मागील उजव्या बाजूने धडक दिली.

धडक होऊन त्यात रिक्षा पलटी झाली आणि त्याखाली सापडून उत्तम शेजूळे यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. आज दुपारी त्याच्यावर देवळालीगाव अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिकरोड पोलिसात या बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार संतोष पाटील करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments