विहितगव येथे वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ….. परिसरात भीतीचे वातावरण……. दोन संशयित आरोपी उपनगर पोलिसांच्या ताब्यात……
उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील विहितगाव येथील रामकृष्ण हाऊसिंग सोसायटीत पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी तीन दुचाकींना आग लावून रस्त्यालगत उभे असलेल्या मालवाहू टेम्पो तसेच पांडुरंग गरेज जवळ उभ्या असलेल्या काही चार चाकी गाड्यांचे समाजकंटकांनी नुकसान केले. विहितगावमध्ये दोघा गुंडांनी मथुरा चौक येथील रामकृष्ण हरी प्राईड सोसायटीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी कल रात्री जाळल्याने भीतीचे वातावरण असून वाहनधारकांची मोठे नुकसान झाले आहे.
त्यानंतर या गुंडांनी विहितगाव, मथुरा चौकात येऊन रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनांवर कोयत्याने हल्ला केला. तसेच या गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयता मिरवत दहशत निर्माण केली.
गाड्यांची तोडफोड करत दुचाकी जाळत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारा प्रकार सी सी टीव्ही मध्ये कैद झाले होते सी सी टीव्ही फुटेज च्या आधारे उपनगर पोलिसांनी पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाने कारवाई करीत काही तासातच उमेश दादा भाऊ धोंगडे,राहुल लहू सोनवणे या दो संशयित आरोपींना अटक केली आहे.
अधिक तपास पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गर्शनाखाली उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, सुरेश गवळी, विनोद लखन, पंकज करपे, राहुल जगताप, सौरभ लोंढे यांनी शिताफीने अटक केली. उपनगर पोलिसांनी बोधले नगर येथील युवकाचा खून प्रकरणी चार जणांना आणि रात्रीक्या घटनेत आरोपींना त्वरित अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक केले आहे.