क्राईम ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार…… नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार…… नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लग्नाचे खोटे आमिष दाखवून प्रेमाचे नाटक करून बलात्कार केल्याची तक्रार नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सद्दाम जाफर शेख रा. राजवाडा, देवळालीगाव, नाशिकरोड याने लग्नाचे आमिश दाखवुन प्रेमाचे नाटक करून वेळोवेळी फिर्यादी व त्याच्या  घरी आणि अनेक ठिकाणी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले.

तसेच त्याची आई, वडील यांनी तु माझे मुलाचा नाद सोडून दे असे बोलून शिवीगाळ केली. तसेच त्याचा भाऊ  रेहमान शेख याने फिर्यादी ला शिवीगाळ करून राहत्या घरी जावुन घराच्या खिडकीच्या काचा फोडुन आईला, ती आमच्या घराकडे का आली माझे भावाचे संसारापासुन तिला लांब रहायला लावा नाहीतर तुम्हाला मारून टाकू असा दम दिल्याची तक्रार दाखल आहे. ऑक्टोंबर 2020 मध्ये सद्दामने फिर्यादी हिला घरी घेऊन जाऊन आई वडील यांच्याशी ओळख करून दिली आणि लवकरच लग्न करू असे म्हणून विश्वासात घेतले.

फिर्यादी ला बरे वाटत नव्हते म्हणून थोड्यावेळ माझे खोलीत आराम कर असे सद्दमने सांगितले.  त्याचे खोलीत आराम करत असतांना काही वेळाने सद्दाम खोलीत आला व त्याने फिर्यादी सोबत जबरीने शारिरीक संबंध केले आणि सध्या तु कुणाला काही सांगु नको जर सांगितले तर मी तुझीच बदनामी करेल, त्यामुळे घाबरून मी कोणाला काहीच सांगितले नाही. यादरम्यान सद्दाम ने अनेक हॉटेल्स मध्ये वेळोवेळी बलात्कार केले.

त्यानंतर फिर्यादी ही गरोदर असल्याचे समजले. सदर बाबत सद्दाम यास सांगितले तेव्हा  सद्दाम ने गर्भापात करण्यास सांगितले. सद्दामने फिर्यादी ला गर्भतापाच्या गोळया खायला दिल्या त्यामुळे फिर्यादीचा गर्भपात झाला. याबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्यात भा. द.वी कलम ३७६, ३१३, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास हा सहायक पोलिस निरीक्षक हांडोरे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *