मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी …….
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात उत्साहात साजरी करण्यात आली. २५० मगासवर्गीय मुलीच्या शासकीय वसतिगृहात ३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी वसतिगृहातील मुलीनी विविध कार्यक्रम सादर केले, अशी माहिती वसतिगृह गृहप्रमुख विजयश्री बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली. या कार्यक्रमास कृषीभूषण तुकाराम बोराडे, विठ्ठल अहिरे, प्राजक्ता कापडणीस, राहुल भुजबळ यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वसतिगृहातील मुलीनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ओवी आणि कविता यावेळी सादर केल्या तसेच क्रांतित्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले यांच्या वेशभूषा साकारत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.