ताज्या बातम्या दुःखत वार्ता

दिवंगत पँथर  दिलीप दासवाणी मास्टर यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार ३ सप्टेंबर रोजी……. आदरांजली सभा

दिवंगत पँथर  दिलीप दासवाणी मास्टर यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार ३ सप्टेंबर रोजी……. आदरांजली सभा…….

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी जिल्हाप्रमुख, नाशिक लोकसभा अध्यक्ष  पॅंथर दिवगंत दिलीप (मास्टर) किशनचंद दासवाणी यांचे प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम रविवार ०३  सप्टेंबर  रोजी सकाळी ११.०० वा आयोजित करण्यात आलेला आहे. पुण्य स्मरण निमित्त मुक्ती धाम समोर छाया निवास हॉटेल किरण येथे सर्व पक्षीय आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पक्ष, संघटनांचे मान्यवर यावेळी दासवाणी (मास्टर)यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहेत.
दिवंगत मास्टर यांच्या स्मृतीना व आठवणींना उजाळा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) नाशिकरोड,  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, नाशिक रोड तर्फे या शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, अशी विनंती संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *