आदिवासी समाजावर होणारे हल्ले थांबावे म्हणून विभागीय आयुक्तांकांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन. …..
आदिवासी समाजावर सुरू असलेला अन्याय आणि समाजकंटकांकडून होणारे सततचे हल्ले, खोटे गुन्हे यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कारवाई करण्याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार पाहण्यास मिळत आहे. गावातील काही जातीवादी समाजकंटक आदिवासी समाजावर हल्लेकरून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत त्यांना दम देऊन जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत गाव सोडण्यास भाग पाडत आहे.
अशीच एक ताजी घटना इगतपुरी तालुक्यातील दारणा नांदगाव येथे घडली आहे. आदिवासी भिल्ल समाजातील लक्ष्मण रामदास पवार या व्यक्तीला गावातील जातीवादी समाजकंटकांनी गावाच्या वेशीला बांधून जबर मारहाण करून गाव सोडून जाण्याचा दम दिला आहे. तसे न केल्यास त्याला जीवे ठार मारू असा इशारा देखील दिला आहे.
आदिवासी समाज्याच्या जमिनीची लूट हे समाजकंटक करत आहे.
त्यामुळे आदिवासी लोकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आपली बाजू कुठे मांडायची? कुठे न्याय मिळवायचा? तसेच वर्षानुवर्षे वनजमीन धारक यांना वनहक्क कायदा 2006 लागू असून देखील वनाधिकार कायद्याची हेळसांड करणारे आणि आदिवासी जनतेच्या भावनेशी खेळणारे फॉरेस्ट अधिकारी यांच्यावर वनहक्क कायद्या अंतर्गत कलम 7 अन्वये गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आदिवासी जनतेस न्याय मिळावा म्हणून निवेदन देण्यात आले.