पंचक खून प्रकरणाचा पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींना ४ तासातच अटक….. नाशिकरोड पोलीसांची कामगिरी……
११ सप्टेंबर रोजी पंचकगाव येथील मनपा मलनिस्सारण केंद्रालगतच्या भिंतीजवळ झाडाझुडपात कुजलेले अवस्थेत ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांचा मृतदेह मिळून आला होता. मयताच्या कपडयावरून पत्नी साधना गायकवाड हिने ओळख केली होती. शवविच्छेदनात कुठल्यातरी तीक्ष्ण व धारदार हत्याराने मारून त्याचा खुन करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत झाडा झुडपात लपविल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी याप्रकरणी कार्तिक सुनिल कोटमे, सुनिल पोपटराव कोटमे या दोन पिता पुत्रांना अटक केली. मयताची मोटर सायकल आरोपीने झाडाझुडपात लपवुन ठेवली होती ती जप्त करण्यात आली आहे. मयात ज्ञानेश्वर यांच्या पत्नीकडे तपास चालू आहे. दोन्ही आरोपिंना ०६ दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे. मयताची पत्नी यांच्या घराजवळ राहणारा १९ वर्षीय कार्तिक सुनिल कोटमे यांचे प्रेमसंबंध होते व त्यात अडसर नको म्हणुन आरोपी कार्तिक सुनिल कोटमे यानेच ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच घटना उघडीस येऊ नये म्हणुन कार्तिक सुनिल कोटमे यांचे वडील सुनिल पोपटराव कोटमे या दोघांनी सिमेंट कॉक्रिट माल प्रेतावर टाकुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींकडून मोटर सायकल, मोबाईल फोन, एक रिक्षा असा एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त श्रीमती मोनिका राऊत व सहायक पोलीस आयुक्त आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड, पोलिस उप निरीक्षक रविंद्र मुन्तोडे, नंदकुमार भोळे, अखलाक शेख, संदीप पावर, सुभाष घेगडमल, कल्पेश जाधव, रोहीत रिदि, यशराज पोतन, अरुण गाडेकर, मनोहर कोळी, पानसरे, नागरे, गोकुळ कासार, विनोद भोर, निलेश वन्हाडे, किरण औटी यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे.