क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोड पोलिसांची मोठी कारवाई एका विधी संघर्षित (अल्पवयीन) बालकाला घेतले ताब्यात…. अल्पवयीन चोरट्याकडून तब्बल १ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त….

नाशिकरोड पोलिसांची मोठी कारवाई एका विधी संघर्षित (अल्पवयीन) बालकाला घेतले ताब्यात….अल्पवयीन चोरट्याकडून तब्बल १ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त….

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची गस्तीदरम्यान मोठी कारवाई….संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी रचला सापळा आणि घरफोडीचा गुन्हा झाला उघड…

 

नाशिकमधून एक धक्कादायक आणि तितकीच मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत चातुर्याने आणि सतर्कतेने एका अल्पवयीन मुलाकडून (विधी संघर्षित बालक) घरफोडीचा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.

अशी झाली कारवाई

नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ३४४/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०५ (अ), ३३१ (३)) नुसार पोलीस घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. दरम्यान, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अजय देशमुख यांना एका अल्पवयीन मुलाच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवादार नितीन भामरे आणि पथकाने त्या मुलाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

काय काय झाले जप्त? (१ लाख रुपयांचा मुद्देमाल)

) ३०,००० रुपयांची सोन्याची पोत (मणी व काळे मणी असलेली)

२) १५,००० रुपयांचे सोन्याचे कानसूल

३) ७,५०० रुपयांचे सोन्याचे कानातील कुडके

४) ७,५०० रुपयांची सोन्याची मुरणी

५) २०,००० रुपयांची चांदीची हातातील कडी

६) २०,००० रुपयांची चांदीची अंगठी

एकूण किंमत: १,००,०००/- रुपये (१ लाख रुपये)

यांच्या पथकाने केली कामगिरी

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुर्यवंशी, नितीन भामरे, नाना पानसरे, अजय देशमुख आणि दीपक दिवटे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *