अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या….साडेचार लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत; गुन्हे शोध पथकाची कामगिरी…

घरात शिरून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका संशयित महिला चोरट्याला जेरबंद करण्यात अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या महिलेकडून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उंटवाडी परिसरातील ‘सेंट्रल पार्क’ येथे राहणाऱ्या सौ. पद्मा बाळकृष्ण मेंदरकर (७५) यांच्या घरात दि. १ मे च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. चोरट्यांनी घरातून सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्रसिंह राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले होते.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस नाईक अनिल गाढवे यांना एका संशयित महिलेबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून संगीता जगन्नाथ कुलकर्णी (वय ४३, रा. सिडको, नाशिक)हिला ताब्यात घेतले. महिला पोलीस अंमलदार प्रिया वडणे यांनी तिची झडती घेतली असता, तिच्याकडे ३०.२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्रसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, शिवाजी आहेर, सपोनि विलास पडोळकर, योगेश देसले, सुभाष दुबे, समाधान शिंदे, मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, केशव ठगे, सागर जाधव, संजय सपकाळे, अनिल गाढवे, फरीद इनामदार आणि वैभव एखंडे यांच्या पथकाने केली.
नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षा वाढवावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.





