क्राईम ताज्या बातम्या

प्रवासी गाडीत चढताना महिलेची पर्स लंपास….आरोपी महिलेला अटक, साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त….

‎प्रवासी गाडीत चढताना महिलेची पर्स लंपास….आरोपी महिलेला अटक, साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त….



‎नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी गाडीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठण चोरी करणाऱ्या महिलेला जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
‎याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा श्रीगोंदेकर (रा. भुसावळ) या 17 जून 2026 रोजी तपोवन एक्सप्रेसने नांदेड येथे जाण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून गाडीत चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील सोन्याचे गंठण असलेली छोटी पर्स चोरी केली. याप्रकरणी नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‎गुन्ह्याचा तपास करताना जीआरपी व आरपीएफच्या संयुक्त पथकाने स्थानक व शहरातील तब्बल 15 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून संशयित लक्ष्मी गणेश सखरे राहणार 10 वा मैल, ओझर, नाशिक तपासात चोरीची कबुली दिली आहे. महिलेकडून 30 ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत 4.50 लाख रुपये, असा मुद्देमाल जप्त केला आहे.
‎ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक संदीप पालवे व एसडीपीओ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन बनकर, आरपीएफ पीआय नवीन सिंग, गुन्हे शोध पथक प्रमुख एएसआय संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील, एएसआय गोविंद दाभाडे, डब्ल्यूएएसआय तारगे, एचसी शैलेश पाटील, सचिन दैवे, डब्ल्यूएचसी सानप, पोलीस शिपाई सुभाष काळे, सागर वर्मा, नितीन मिस्त्री तसेच महिला आरपीएफ कर्मचारी केवल झाल्टे यांनी केली.
‎सदर गुन्ह्याचा पुढील तपास एएसआय संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *