मुंबई-आग्रा महामार्गावर आज सकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. शहादा डेपोची एसटी बस अनियंत्रित होऊन थेट झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात ७ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने, मोठा अनर्थ टळला असून प्रवाशांनी मृत्यूला जवळून अनुभवले.
Oplus_131072
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा डेपोची बस (MH 14 BT 2310) आज सकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरून जात असताना देवळा तालुक्यातील उमराणे शिवार परिसरात आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बस वेगात असल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या गुलमोहराच्या झाडावर जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा पुढचा भाग मोठ्या प्रमाणावर चक्काचूर झाला आहे.
अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी प्रवास करत होते. अचानक बस झाडावर आदळल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता.
या अपघातात चालकासह ७ ते ८ प्रवासी जखमी झाले आहे काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवले.
घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून अधिक तपास सुरू आहे.
महामार्गावर सातत्याने होणारे अपघात आणि एसटी बसची सुरक्षितता यावर आता प्रवाशांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. “नशिबाने बलवत्तर म्हणून आज जीव वाचला,” अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
नाशिक पोलिसांची मोठी कारवाई: ३ वर्षांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील घरफोडी बहाद्दर अखेर जेरबंद…. नाशिक मागील तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आणि रेकॉर्डवरील फरार असलेला घरफोडीचा अट्टल आरोपी अखेर नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्र. २ च्या जाळ्यात अडकला आहे. अफजल हुसेन सय्यद (वय २९, रा. बलकवडे व्यायामशाळेसमोर, बलकवडे चाळ, भगूर, नाशिक) असे अटक करण्यात […]
शिवसेना सोशल मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर….. दिनेश साधवानी लोकसभा प्रमुख पदी…. नाशिक शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच […]
वादळी वाऱ्यामुळे पडलेली झाडे हटवून नाशिक रोड अग्निशमन दलाची तातडीची मदत….वाहतूक सुरळीत…. नाशिक रोड अग्निशमन दलाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तातडीने घटनास्थळी धाव घेत पडलेली मोठी झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली तसेच संभाव्य धोका टाळला. पहिल्या घटनेत वडनेर रोडवरील आर्टिलरी गेटसमोर मोठे भेंडीचे झाड रस्त्यावर कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला दूरध्वनीद्वारे मिळाली. झाडाखाली केळी विक्रेत्याची हातगाडी व […]