ताज्या बातम्या नाशिक

नाशिककरांनो लक्ष द्या… मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या दौऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल….हे’ आहेत पर्यायी मार्ग….

नाशिककरांनो लक्ष द्या… मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या दौऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल….हे’ आहेत पर्यायी मार्ग….

Oplus_131072

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान व्हीआयपी हालचाली, नागरिक व कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

नाशिकच्या अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मोटार वाहन अधिनियमांतर्गत याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
ही वाहतूक अधिसूचना ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून ते ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८:०० वाजेपर्यंत लागू राहील.

Oplus_131072

कशी असेल नवी वाहतूक व्यवस्था? पाहा पर्यायी मार्ग..नाशिक ते त्र्यंबकेश्वर (पहिने फाटा मार्गे)

नवा पर्यायी मार्ग: त्र्यंबकेश्वर
हरसूल फाटा – गोवर्धन , गिरणारे ,ओझरखेड , देवगाव,वाघेराफाटा, अंबुजडाईन,म्हसरुळ मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

जव्हार-मोखाडा-आंबोलीकडून नाशिककडे जाणारी वाहने:

नवा पर्यायी मार्ग: जव्हार – मोखाडा – आंबोली टी-पॉईंट – वाघेरे फाटा – खोडे – वरपे – देवगाव – रिधोरे – रावळगाव मार्गे नाशिक शहरात प्रवेश करता येईल.

मुंबई बाजूकडून बेलगावढगा मार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहने:

नवा पर्यायी मार्ग: बेलगावढगा – नाशिक – अंबुजडाईन – वाघेराफाटा – गोवर्धन – गिरणारे – ओझरखेड मार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाता येईल.

Oplus_131072

पहिने-तोरणवाडी ते नाशिक मार्ग..पहिने ते त्र्यंबकेश्वर मार्ग

नवा पर्यायी मार्ग: पहिने – तिल्लोळ – शिरपुंज फाटा – मानकुर्णाव्हाटा – वाघमारे मार्गे त्र्यंबकेश्वर.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
दौऱ्याच्या काळात भाविक, प्रवासी आणि वाहनचालकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *