महाराष्ट्राची अभिमानास्पद ऐतिहासिक कामगिरी……अस्मिता महिला सायकलिंग लीग……

रुद्रपूर उत्तराखंड येथे २ ते ३ मे २०२६ दरम्यान आयोजित अस्मिता महिला सायकलिंग लीग स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला सायकलपटूंनी दमदार कामगिरी करत सब कनिष्ठ श्रेणीत एकूण गुणांच्या आधारे चॅम्पियनशिप जिंकत ऐतिहासिक यश संपादन केले.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत राज्याचा गौरव वाढवला. नाशिकच्या शिया लालवानी हिने व्यक्ती प्रयत्न आणि स्क्रॅच शर्यत या दोन्ही प्रकारांत कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

शिया ललवाणी हिच्या यशामागे खेळाडूंच्या मेहनतीसोबतच प्रशिक्षक दर्शन बारुणे यांचे मार्गदर्शन आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले. शिया हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत. नाशिक जिल्हा सायकलिंग फाउंडेशन यांच्या सातत्यपूर्ण सहकार्य, प्रोत्साहन यामुळे सर्व शक्य झाले. नाशिक सिंधी पंचायतीतर्फे सिया ललवाणी हिने मिळविलेल्या यशाबद्दल नाशिक सिंधी समाजातर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राच्या यशामुळे महाराष्ट्राच्या महिला सायकलिंग क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे.





